घटना

१७०२: पहिले इंग्लिश भाषा दैनिक ‘डेली कौरंट’ प्रकाशित.

१८५०: पहिले वैद्यकिय महिला महाविद्यालय ‘विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्वेनिया’ स्थापित.

१८८६: पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली.

१९९९: नॅसडॅक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली.

२००१: बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.

२००१: कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारे हरभजनसिंग हे पहिले भारतीय गोलंदाज बनले. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.

२००७: २००७च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन.

२०११: जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

जन्म/वाढदिवस

१८११: अर्बेन जिन जोसेफ ली व्हेरिअर, नेपच्युन ग्रहाचा सहसंशोधक.

१८९०: व्हॅनेव्हर बुश, पहिल्या ऍनॉलाग इलेक्ट्रॉनिक संगणकाचा निर्माता.

१९१२: नाटककार शं. गो. साठे

१९१५: विजय हजारे, भारतीय क्रिकेटपटू फलंदाज.

१९१६: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९९५)

१९८५: श्रीलंकेचा गोलंदाज अजंता मेंडिस यांचा जन्म.

मृत्यू/पुण्यतिथी

१६८९: छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे निधन. (जन्म: १४ मे १६५७)

१९५५: नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग . (जन्म: ६ ऑगस्ट १८८१)

१९५७: दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर जाणारा पहिला अमेरिकन वैमानिक आणि समन्वेशक रिचर्ड ईव्हेलिन बर्ड .

१९६५: गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू . (जन्म: १२ डिसेंबर १८९२)

१९७०: अमेरिकन लेखक आणि वकील अर्ल स्टॅनले गार्डनर . (जन्म: १७ जुलै १८८९)

१९७९: संपादक यशवंत कृष्ण खाडिलकर .

१९९३: हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक . (जन्म: २५ एप्रिल १९१८ – अहमदनगर)

२००६: सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच . (जन्म: २० ऑगस्ट १९४१)