जन्मदिवस / वाढदिवस
१८७६: चारुचंद्र बंदोपाध्याय –बंगाली कथालेखक व कादंबरीकार.प्रवासी, मॉडर्न, रिव्ह्यू इ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता. (मृत्यू: १७ डिसेंबर १९३८ – कलकत्ता)
१९०२: लोकनायक जयप्रकाश नारायण –स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान (मृत्यू: ८ आक्टोबर १९७९ –पाटणा, बिहार)
१९१६: चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख –समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा व राज्यसभा सदस्य, डी. लिट. (पुणे विद्यापीठ –१९९७),
पद्मविभूषण. त्यांनी रचनात्मक ग्रामीण विकासाला वेगळी दृष्टी दिली. डोमरी येथील सोनदरा गुरुकुलम, ग्रामोदय विश्वविद्यालय, उदयमिता विद्यापीठ,
आयुर्वेद विद्याप्रतिष्ठान, गोमाता संगोपन प्रकल्प अशा विविध संस्थांमार्फत विधायक कार्यक्रमांचे जाळे त्यांनी विकसित केले. (मृत्यू: २६ फेब्रुवारी २०१०)
१९१६: रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर –चित्रपट व नाट्य अभिनेत्री, ब्रम्हचारी चित्रपटातील यमुनाजळी खेळू … या गाण्यासाठी प्रसिद्ध (मृत्यू: ३ जून १९९७)
१९३०: पत्रकार व स्तंभलेखक बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००१)
१९३२: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट २०१२)
१९४२: चित्रपट अभिनेते व निर्माते अमिताभ बच्चन यांचा जन्म.
१९४३: वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू कीथ बॉईस यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९९६)
१९४६: विजय भटकर –संगणकतज्ञ .सी. डॅक या प्रगत संगणकीय विकसन केन्द्राचे संस्थापक. ८ ग्रंथांचे लेखन-संपादन व सुमारे ७५ शोधनिबंध यांमुळे
त्यांनी संगणकीय विज्ञान क्षेत्रात मोलाची भर घातली आहे.
१९५१: हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद यांचा जन्म.
१८८९: ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल . (जन्म: २४ डिसेंबर १८१८)
१९६८: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज –ईश्वरभक्तीबरोबरच समाजसुधारणेचे विषयही कीर्तनात हाताळल्याने
त्यांना राष्ट्रसंत असे संबोधले जाते. ग्रामगीता हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. (जन्म: ३० एप्रिल १९०९)
१९८४: आक्रमक डावखुरे फलंदाज खंडेराव मोरेश्वर ऊर्फ खंडू रांगणेकर . (जन्म: २७ जून १९१७)
१९९४: दिगंबर परशुराम तथा काकासाहेब दांडेकर –उद्योगपती, कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक
१९९६: वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू कीथ बॉईस . (जन्म: ११ ऑक्टोबर १९४३)
१९९७: विपुल कांति साहा –आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे सदस्य
१९९९: रमाकांत कवठेकर –नागीण, आघात, पंढरीची वारी यांसारख्या पारितोषिकप्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शक
२०००: स्कॉटलंड देशाचे पहिले मंत्री डोनाल्ड डेवार . (जन्म: २१ ऑगस्ट १९३७)
२००२: अभिनेत्री दीना पाठक .
२००७: भारतीय अध्यात्मिक गुरु चिन्मोय कुमार घोस उर्फ श्री चिन्मोय . (जन्म: २७ ऑगस्ट १९३१)
२०१८: गुरुदास अग्रवाल तथा स्वामी ज्ञानस्वरूप सानंद हे भारतीय पर्यावरणवादी कार्यकर्ते होते. गंगा नदी वाचवण्यासाठी
आमरण उपषणाला बसलेले असताना १११ दिवसांच्या उपोषणानंतर निधन. ( जन्मतारीख: २० जुलै, १९३२)