१८५१: आयझॅक सिंगर यांना शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.
१८८३: शेवटचा क्गगा (आफ्रिकन झेब्रा) मरण पावला.
१९२०: शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरू केले.
१९२२: राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ ४ वर्षांनी त्यांनी लिहीलेल्या राजसंन्यास नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९४२: चले जाव चळवळ – पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार, २ ठार १६ जखमी.
१९४८: लंडनमधे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले.
१९५०: अमेरिकन युद्धकैद्यांना उत्तर कोरियन सैन्याने ठार मारले.
१९५२: मॉस्कोमधे १३ ज्यू विद्वानांची हत्या.
१९५३: पहिल्या थर्मोन्युक्लिअर बॉम्बची चाचणी करण्यात आली.
१९६०: नासा च्या पहिल्या संचार उपग्रह इको – १ए चे यशस्वी प्रक्षेपण झाले.
१९६४: वंशभेद केल्याबद्दल दक्षिण अफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धांमधुन हकालपट्टी झाली.
१९७७: श्रीलंकेत झालेल्या वांशिक दंगलीत ३०० हुन अधिक तामिळ ठार झाले.
१९८१: आय. बी. एम. कंपनीचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर बाजारात आला.
१९८२: परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळे काढले. त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसर्‍या जगातील देशांमधे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.
१९८९: कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जागतिक मराठी परिषद मुंबई येथे सुरू झाली.
१९९०: दक्षिण डकोटा मध्ये सु हॅन्ड्रिकसन यांना सर्वात मोठा आणि सर्वात संपूर्ण टायरनोसॉरस रेक्स चा हाडांचा सापळा सापडला.
१९९५: जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे.
१९९८: सचिन तेंडुलकर यांना राजीव गांधी खेल रत्‍न पुरस्कार जाहीर.
२०००: प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड.
२००२: १२ वर्षे ७ महिने वयाचा सर्गेई कार्जाकिन हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनला.
२००५: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरमगार यांची तामिळ अतिरेक्यांनी हत्या केली.   २०१५: चीनच्या तियांजिन इथे झालेल्या बॉम्बस्फोटात ५० लोकांचा मृत्यू तर कमीतकमी ७०० जण जखमी

१९६४ : इयान फ्लेमिंग –दुस-या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँडचा जनक (जन्म: २८ मे १९०८)
१९६८: नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य बाळशास्त्री व्यंकटेश हरदास .
१९७३: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर . (जन्म: १२ मार्च १९११)
१९८२: अमेरिकन अभिनेते हेन्री फोंडा . (जन्म: १६ मे १९०५)
१९८४: कवी, समीक्षक व अनुवादक आनंदीबाई जयवंत.
२००५: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार . (जन्म: १२ एप्रिल १९३२)
२०१८ : सोमनाथ चॅटर्जी, कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. १४ व्या लोकसभेचे सभापती होते. (जन्म- २५ जुलै, १९२९)