१७५५: डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन.
१८८२: आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.
१९०१: जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.
१९११: दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
१९७१: संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले.
२००० : आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
२००१: पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
२०१६: प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले. २०१६: बिपिन रावत,भारतीय लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती (३१ डिसेंबर २०१६ ला पदभार ग्रहण )

१९३०: परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू यांचे मोटारीखाली चिरडून निधन.
१९६४: मैथिलिशरण गुप्त –हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या भारतभारती या काव्यग्रंथामुळे
त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. (जन्म: ३ ऑगस्ट १८८६)
१९९१: दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर –शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष (१९६३ – १९६६)
१९९२: पं. महादेवशास्त्री जोशी –साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक (जन्म: १२ जानेवारी १९०६ – आंबेडे, सातेरी, गोवा)
२०००: जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल –कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (३१ मे १९९६ – ७ आक्टोबर १९९९) (जन्म: १ आक्टोबर १९३०)
२००५: हिंदी चित्रपट निर्माते रामानंद सागर. (जन्म: २९ डिसेंबर १९१७)
२००६: सीगेट टेक्नोलॉजी चे सहसंस्थापक अॅलन शुगर्ट . (जन्म: २७ सप्टेंबर १९३०)
२०१२: पण्डित रवी शंकर –सतार वादक, भारतरत्‍न (जन्म: ७ एप्रिल १९२०)
२०१२: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी . (जन्म: २८ डिसेंबर १९२७)
२०१५: भारतीय शेतकरी आणि राजकारणी शरद अनंतराव जोशी . (जन्म: ३ सप्टेंबर १९३५)