१६६६: आग्ऱ्याहून सुटका, शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले.
१८५७: कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व ४२६ प्रवाशांसह बुडाले.
१८९७: तिरह मोहिम: सारगढीची लढाई.
१९१९: अॅडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये प्रवेश केला.
१९३०: विल्फ्रेड र्‍होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.
१९४८: भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. जुलुमी रझाकारांच्या मदतीने स्वतंत्र राहण्याचा निजामाचा हट्ट मोडून या फौजांनी हैदराबाद ताब्यात घेतले.
हैदराबाद मुक्तीच्या या कारवाईचे वर्णन पोलिस अ‍ॅक्शन असे केले जाते.
१९५९: ल्युना-२ हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.
१९८०: तुर्कस्तानमध्ये लष्करी उठाव.
१९९८: डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.
२००२: मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
२००५: हाँगकाँगमधील डिस्‍नेलँड (Disney Land,Hong Kong)सुरू झाले.
२०११: न्यूयॉर्क शहरातील ९/११ मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले.

१९१८: ऑस्ट्रेलियाचे चौथे पंतप्रधान जॉर्ज रीड .
१९२६: विनायक लक्ष्मण भावे –मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार आणि महाराष्ट्र सारस्वत या मराठी साहित्येतिहास ग्रंथाचे लेखक,
१८९३ मध्ये त्यांनी ठाणे येथे मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली. (जन्म: १८७१)
१९५२: रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व –हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य,
पं भीमसेन जोशी आणि गंगुबाई हनगळ यांचे गुरू, दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना सवाई गंधर्व ही पदवी दिली. (जन्म: १९ जानेवारी १८८६)
१९७१: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ . (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)
१९८०:चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे मुंबई-गोवा महामार्गावर मंतरलेली चैत्रवेल हे नाटक घेऊन चाललेल्या
नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले. (जन्म: १४ डिसेंबर १९३९)
१९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचे मुंबई-गोवा महामार्गावर मंतरलेली चैत्रवेल हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले. (जन्म: २ मार्च १९२५)
१९९२: पं. मल्लिकार्जुन मन्सूर –हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, (ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य) नीलकंठबुवा अलुरमठ
आणि (जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र) मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले, पद्‌मविभूषण व कालिदास सन्मान
आदी मानसन्मान त्यांना मिळाले. (जन्म: ३१ डिसेंबर १९१०)
१९९३: अमेरिकन अभिनेता रेमंड बर.
१९९६: पं. कृष्णराव रामकृष्ण चोणकर –मराठी व गुजराती संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते, एक तपाहून अधिक काळ गंधर्व
नाटक मंडळीमध्ये नटसम्राट बालगंधर्वांचे नायक म्हणून त्यांनी काम केले
१९९६:पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री, स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना म्हणून ख्याती (जन्म: ७ जुलै १९४८)