१६४२: क्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.
१८९८: कार्ल गुस्ताव्ह विट याने ४३३ Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.
१९१८: बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.
१९५४: रेडिओ पाकिस्तान वरुन कौमी तराना हे पाकिस्तानचे राष्ट्रगीत प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले.
१९६१: आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने आपल्या सीमा बंद केल्या. बर्लिनची भिंत बांधण्यास सुरूवात झाली.
१९९१: कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
२००४: ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. सुमारे ३०० दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन अंदाजे ४ अब्ज लोकांनी हा उद्‍घाटन सोहळा पाहिला.
२०१७: ऑक्सिजनचा पुरवठा ठप्प झाल्यानं उत्तर प्रदेश च्या गोरखपूर रूग्णालयात ६० मुलांचा मृत्यू

१७९५: देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार करणाऱ्या मालवा राजघराण्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर . (जन्म: ३१ मे १७२५)
१८२६: स्टेथोस्कोपचे शोधक रेने लायेनेस्क . (जन्म: १७ फेब्रुवारी १७८१)
१९१०: आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणा-या ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल. १९०७ मधे
त्यांना ऑर्डर ऑफ मेरिट हा किताब बहाल करण्यात आला. नोटस ऑफ नर्सिंग हा त्यांचा ग्रंथ नावाजलेला आहे. (जन्म: १२ मे १८२०)
१९१७: आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर . (जन्म: २० मे १८६०)
१९३६:मॅडम भिकाजी रुस्तुम कामा –या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या.
१९०७ मधे जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला.
त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून वंदे मातरम हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला. (जन्म: २४ सप्टेंबर १८६१)
१९४६: विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक एच. जी. वेल्स. (जन्म: २१ सप्टेंबर १८६६)
१९७१: बेंटले मोटर्स लिमिटेडचे संस्थापक डब्ल्यू. ओ. बेंटले.
१९८०: अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे. (जन्म: १२ एप्रिल १९१०)
१९८५: मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे. विलार्ड मेरिऑट . (जन्म: १७ सप्टेंबर १९००)
१९८८: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक गजानन जागीरदार .
२०००: पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया हसन . (जन्म: ३ एप्रिल १९६५)
२०१५: हिरो सायकल चे सहसंस्थापक ओम प्रकाश मुंजाल . (जन्म: २६ ऑगस्ट १९२८)
२०१६: भारतीय हिंदू नेते प्रमुख स्वामी महाराज. (जन्म: ७ डिसेंबर १९२१)