घटना

१७८१: विल्यम हर्षेल यांनी युरेनसचा शोध लावला.

१८९७: सॅन डीयेगो विद्यापीठाची स्थापना झाली.

१९१०: पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.

१९३०: क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग यांनी प्लुटो ग्रह शोधल्याचे हार्वर्ड विद्यापीठातील वेधशाळेला कळवले.

१९४०: अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.

१९६३: अर्जुन पुरस्काराची सुरुवात.

१९९७: कोलकात्यातील मिशनरीज् ऑफ चॅरिटीने मदर तेरेसांची वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड केली.

१९९९: कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाले.

२००३: मुंबई शहरातील लोकल रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले

२००७: वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्‍घाटन झाले.

जन्म/वाढदिवस

१७३३: इंग्लिश रसायनशास्रज्ञ जोसेफ प्रिस्टले यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १८०४)

१८९३: प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी

१८९६: प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १९८५)

१९२६: ललित लेखक रवींद्र पिंगे यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर २००८)

१९३८: ४९वे योकोझुना जपानी सुमो तोचीनौमी तेरुयोशी .

मृत्यू/पुण्यतिथी

१८००: पेशवे दरबारातील एक मंत्री नानासाहेब फडणवीस . (जन्म: १२ फेब्रुवारी १७४२ – सातारा)

१८९९: दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त . (जन्म: २७ जून १८७५)

१९०१: अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन हॅरिसन . (जन्म: २० ऑगस्ट १८३३)

१९५५: नेपाळचे राजे वीर विक्रम शाह त्रिभुवन . (जन्म: २३ जून १९०६)

१९६७: वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू सर फँक वॉरेल यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९२४)

१९६९: मोहिनीराज लक्ष्मण दत्तात्रेय,भारतीय गणितशास्त्रज्ञ

१९९४: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व सिटू या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते श्रीपाद यशवंत कोल्हटकर यांचे निधन.

१९९६: अभिनेते आणि नाट्यनिर्माते शफी इनामदार . (जन्म: २३ ऑक्टोबर १९४५)

१९९७: राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू शीला इराणी

२००४: सतारवादक उस्ताद विलायत खाँ . (जन्म: २८ ऑगस्ट १९२८)

२००६: चिकन नुग्गेत चे निर्माते रॉबर्ट सी बेकर . (जन्म: २९ डिसेंबर १९२१)