१८४१: जेम्स ब्रॅडी यांना प्राण्यांच्या आकर्षणामुळे संमोहन विषयावर अभ्यास करण्याला प्रोत्साहन मिळाले.
१८६४: ग्रीस देशाने नवीन संविधान स्वीकारले जाते.
१९१३: रवीन्द्रनाथ टागोर यांना स्वीडिश अॅकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर केले.
१९२१: वामनराव पटवर्धनांनी पुढाकार घेऊन पुण्यास अखिल भोर संस्थान प्रजा सभा स्थापन केली.
१९३१: शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली.
१९४७: सोव्हिएत युनियनने एके ४७ बंदुक तयार केली.
१९७०: बांगला देशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे ५,००,००० लोक मृत्यूमुखी पडले. ही विसाव्या शतकातील
सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती.
१९९४: स्वीडनमधे घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.
२०१२: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महासागराच्या काही भागात पूर्ण सूर्यग्रहण झाले.
२०१४: भारतीय क्रिकेट खेळाडू रोहित शर्मा ने एक दिवसीय अंतर्राष्ट्रीय मॅच मधे एका इंनिंगमधे २६४ रन करून किर्तीमान स्थापित केले.
२०१५: पॅरीस मध्ये आतंकवादी हल्ल्यात १२८ लोकांचा मृत्यू,राष्ट्रीय आपत्ती घोषीत.
२०१५: तामिळनाडूत पावसाच्या तडाख्यात ५५ लोकांचा मृत्यू.