घटना

१८०३: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायाधीश जॉन मार्शलने जाहीर केले की अमेरिकन संविधानाच्या विरुद्ध असलेला कुठलाही कायदा लागू करता येणार नाही.

१८५९: ओरेगोन अमेरिकेचे ३३वे राज्य झाले.

१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रेने एकाच दिवशी दूरभाष यंत्रणेच्या पेटंटसाठी अर्ज केला.

१८९९: अमेरिकेत निवडणुक यंत्र वापरण्यास सुरूवात.

१९१२: अ‍ॅरिझोना अमेरिकेचे ४८वे राज्य झाले.

१९१२: ग्रोटोन, कनेक्टिकट येथे पहिली डीझेल पाणबुडी तयार झाली.

१९१८: एडगर राइस बरोच्या टारझनवरील पहिला सिनेमा प्रदर्शित झाला.

१९२४: संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एमची स्थापना.

१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एर फोर्सने जर्मनीच्या ड्रेस्डेन शहरावर तुफानी बॉम्बफेक केली व शहर बेचिराख केले.

१९४५: चिली, इक्वेडोर, पेराग्वे व पेरू संयुक्त राष्ट्रात दाखल.

१९४५: अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट व सौदी अरेबियाचा राजा इब्न सौद यांच्यात बैठक. अमेरिका व सौदी अरेबियात राजकीय संबंध सुरू.

१९४६: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण.

१९४६: पहिला संगणक एनियाक युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.

१९६१: १०३ क्रमांकाचा मूलभूत पदार्थ, लॉरेन्सियमची प्रथमतः निर्मिती.

१९६६: ऑस्ट्रेलियन डॉलरचे दशमान पद्धतीत रूपांतर.

१९८९: भोपाळ दुर्घटना – युनियन कार्बाइडने भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले.

१९८९: ईराणच्या रुहोल्ला खोमेनीने ब्रिटीश लेखक सलमान रश्दीच्या खूनाचा फतवा काढला.

जन्म

१४८३: बाबर, मोगल सम्राट.

१६३०: सॅम्युएल बटलर, इंग्लिश कवी.

१९१३: जिमी हॉफा, अमेरिकन कामगार नेता.

१९३३: मधुबाला, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

१९४२: मायकेल ब्लूमबर्ग, न्यूयॉर्कचा महापौर.

१९४६: बर्नार्ड डोवियोगो, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.

१९४७: सलाहुद्दीन, क्रिकेट खेळाडू, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

१९६८: क्रिस लुईस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९७३: एच.डी. ऍकरमन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

१४००: रिचर्ड दुसरा इंग्लंडचा राजा.

१४०५: तैमुर लंग, मोंगोल राजा.

१५२३: पोप एड्रियान सहावा.

१८३१: व्हिसेंते ग्वेरेरो, मेक्सिकोचा स्वातंत्र्यसैनिक.

१८९१: विल्यम टेकुमेश शेर्मन, अमेरिकन सेनापती.

१९७५: पी.जी.वुडहाउस, ब्रिटीश लेखक.

१९८९: जेम्स बॉन्ड, अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ.

१९९५: उ नु, म्यानमारचा राजकारणी.

२००५: रफिक हरिरि, लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष.