१७७०: जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्रोत शोधला.
१९२२: ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंग्डम मध्ये रेडिओ सेवेची सुरूवात केली.
१९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.
१९६९: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना.
१९७१: मरीनर – ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.
१९७५: स्पेनने पश्चिम सहारा सोडून दिले.
१९९१: जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
२०१३: सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना
मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.
२०१५: फ्रान्स ची राजधानी पॅरिस वर इसिस चा दहशतवादी हल्ला. इस्लामिक स्टेट ने पॅरिस हल्ल्याची जबाबदारी घेतली.

१९१५: अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन. (जन्म: ५ एप्रिल १८५६)
१९६७: क्रिकेटपटू सी. के. नायडू . (जन्म: ३१ ऑक्टोबर १८९५)
१९७१:नारायण हरी आपटे –कादंबरीकार, चित्रपट कथालेखक. सुखाचा मूलमंत्र, पहाटेपुर्वीचा काळोख, उमज पडेल तर, एकटी या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक
कादंबर्‍या होत. कुंकू हा गाजलेला चित्रपट त्यांच्या न पटणारी गोष्ट या कादंबरीवर आधारलेला होता. (जन्म: ११ जुलै १८८९ –समडोळी, जिल्हा सांगली)
१९७७: अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद –हरेकृष्ण पंथाचे संस्थापक (जन्म: १ सप्टेंबर १८९६)
१९९३: डॉ. मणिभाई भीमभाई देसाई –स्वातंत्र्यसैनिक, महात्मा गांधींचे सच्‍चे अनुयायी, ग्रामीण विकासाचा पाया घालणारे सामाजिक कार्यकर्ते,
दुधाचा महापूर योजनेचे एक शिल्पकार (जन्म: २७ एप्रिल १९२०)
२०००: गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर . (जन्म: ५ नोव्हेंबर १९२९)
२०१३: भारतीय निर्माते आणि व्यवस्थापक सुधीर भट .
२०१३: भारतीय पत्रकार आणि लेखकहरि कृष्ण देवसरे. (जन्म: ९ मार्च १९३८)
२०१५: भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के.ए. गोपालकृष्णन.