१८८२: भारतात (सध्याच्या पश्चिम पाकिस्तान) पंजाब विद्यापीठ सुरु झाले.
१९१२: मिलवॉकी, विस्कॉन्सिन येथे निवडणूक प्रचाराचे भाषण करत असताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्ट यांच्यावर
जॉन श्रॅन्क या वेडसर इसमाने खूनी हल्ला केला. गोळी लागून रक्तस्राव होत असतानाही रूझवेल्ट यांनी आपले भाषण पूर्ण केले.
१९२०: ऑक्सफर्ड विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली.
१९२६: ए. ए. मिल्ने यांचे विनी-द-पूह हे लहान मुलांसाठी पुस्तक प्रकाशित झाले.
१९३३ : राष्ट्रसंघातुन (League of Nations) नाझी जर्मनीने अंग काढुन घेतले.
१९४७: चार्ल यॅगर या वैमानिकाने X-1 या विमानातून पहिले यशस्वी स्वनातीत (ध्वनीपेक्षा जास्त वेगाने) उड्डाण केले.
याआधी मानवरहित उड्डाणे झाली होती.
१९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.
१९८१: अन्वर साद्त यांच्या हत्येनंतर एक आठवड्यानी उपराष्ट्राध्यक्ष होस्‍नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
१९८२: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले.
१९९८: विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर.

१९१९: जर्मन उद्योगपती जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स. (जन्म: ३० जुलै १८५५)
१९४४: जर्मन सेनापती एर्विन रोमेल . (जन्म: १५ नोव्हेंबर १८९१)
१९४७: साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेब केळकर –लोकमान्य टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांनी १८९७ पासून केसरी व मराठाचे संपादन केले.
कायदेमंडळाचे सभासद, दहा नाटके, आठ कादंबर्‍या, दोन कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, ठ चरित्रात्मक ग्रंथ आणि विवेचनात्मक ग्रंथ इ.
त्यांची साहित्यसंपदा. (जन्म: २४ ऑगस्ट १८७२)
१९५३: रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे –समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचारप्रवर्तन
व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र (जन्म: १४ जानेवारी १८८२)
१९९३: वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष लालचंद हिराचंद दोशी . (जन्म: २४ ऑक्टोबर १९०४)
१९९४: सेतू माधवराव पगडी –इतिहासकार, विचारवंत, संशोधक, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी,
गॅझेटियर्सचे संपादक असे विविधांगी पैलू असलेले व्यक्तिमत्त्व. गोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलिंवर त्यांनी लिखाण केले.
जीवनसेतू हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: २७ ऑगस्ट १९१०)
१९९७: अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स . (जन्म: २१ मे १९१६)
१९९९: टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्युलिअस न्येरेरे. (जन्म: १३ एप्रिल १९२२)
२००४: स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ व कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी. (जन्म: १० नोव्हेंबर १९२०)
२०१३ केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया. (जन्म: १४ फेब्रुवारी १९२५)
२०१५: भारतीय नौसेनाधिपती राधाकृष्ण हरिराम तहिलियानी. (जन्म: १२ मे १९३०)