७८६: हरुन अल रशिद बगदादचा खलिफा झाला.
१८९३: सरदार खाजवीवाले, श्री. गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले. लोकमान्य टिळकांनी
हा उपक्रम उचलून धरून त्याला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरुप दिले. हीच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात होय.
१९१७: रशियाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.
१९४८: दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला. देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर सुमारे साडे सहाशे
वर्षांनी स्वतंत्र झालेल्या किल्ल्यात भारतमातेचे मंदिर उभारण्यात आले.
१९४९: हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.
१९५९: सोव्हिएत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोहोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती.
१९६०: ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज (OPEC) ची स्थापना झाली.
१९७८: व्हेनेरा-२ हे रशियाचे अंतराळयान शुक्राकडे झेपावले.
१९९५: संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
१९९७: बिलासपूर अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस रेल्वे दुर्घटनेत ८१ जण ठार झाले.
१९९९: किरिबाटी, नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
२०००: मायक्रोसॉफ्ट कंपनी ने विंडोज एमई रिलीज केले.
२००३: इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.

८९१: पोप स्टीफन (पाचवा) .
१९०१: अमेरिकेचे २५वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅकिन्ले. (जन्म: २९ जानेवारी १८४३)
१९७९: अफगणिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष नूर मोहमद तराकी . (जन्म: १५ जुलै १९१७)
१९८९: बेन्जामिन पिअरी पाल –आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक, पद्मश्री (१९५८), पद्मभूषण (१९६८),इंडीयन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च (ICAR)
चे पहिले संचालक, तांबेरा रोगाला दाद न देणार्‍या व अधिक उत्पादन देणार्‍या गव्हाच्या जाती त्यांनी शोधून काढल्या. (जन्म: २६ मे १९०६)
१९९८: शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राम जोशी .
२०११: कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार. (जन्म: ५ जून १९५०)
२०१५: सबवे चे सहसंस्थापक फ्रेड डेलुका . (जन्म: ३ ऑक्टोबर १९४७)