१८०३: नागपूरकर भोसलेंनी ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला.
१९४१: जपानी सैन्याचा हाँगकाँगमध्ये प्रवेश झाला.
१९६०: नेपाळचे राजा महेन्द्र यांनी देशाचे संविधान, संसद आणि कॅबिनेट निलंबित करून थेट शासन लादले.
१९७० : व्हेनेरा – ७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले. पृथ्वी सोडुन इतर कुठल्याही ग्रहावर उतरणारे हे पहिलेच यान होते.
१९७१: बांगलादेश स्वतंत्र झाला.
१९७६: सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९९१: चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.
१९९८: बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक मिळाले.
२००३: फ्रांसचा फुटबॉलपटू झिनादिन झिदान यांची वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड झाली.

१७४९: छत्रपती शाहूजी महाराज . (जन्म: १८ मे १६८२)
१८७८: बेकिंग पावडरचे शोधक आल्फ्रेड बर्ड .
१९५०: सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष.
भारतरत्‍न (मरणोत्तर ,१९९१) (जन्म: ३१ आक्टोबर १८७५)
१९६६: वॉल्ट इलायन डिस्‍ने ,अ‍ॅनिमेशनपटांचे प्रणेते, मिकी माऊसचे जनक (जन्म: ५ डिसेंबर १९०१)
१९८५: मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर रामगुलाम यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९००)