घटना

३९९: सॉक्रेटिसला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

१६३७: फर्डिनांड तिसरा पवित्र रोमन सम्राटपदी.

१७६४: अमेरिकेतील मिसुरी राज्यात सेंट लुई शहराची स्थापना.

१८६२: अमेरिकन यादवी युद्ध – जनरल युलिसिस एस. ग्रँटने टेनेसीतील फोर्ट डोनेलसन किल्ल्यावर हल्ला चढवला.

१८७९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी.

१९४२: दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटीश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटीश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.

२०१३: रशियाच्या चेल्याबिन्स्क शहरावरील आकाशात मोठा उल्कापात होउन झालेल्या स्फोटात ७००पेक्षा अधिक जखमी

२०१७: भारत इसरो ने पीएसएलवी-सी३७ रॉकेट द्वारा १०४ उपग्रह एकसाथ सोडल्याचा विक्रम

जन्म

१४७१: पियेरो दि लॉरेन्झो दे मेदिची, फ्लोरेन्सचा राजा.

१५६४: गॅलेलियो, इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ व अंतराळतज्ञ.

१७१०: लुई पंधरावा, फ्रांसचा राजा.

१८२०: सुझन बी. अँथोनी, अमेरीकेतील स्त्रीमुक्तिवादी कार्यकर्ती.

१८४१: मनोएल फेरेझ दि काम्पोस सॅलेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.

१८७१: आल्फ़्रेड व्हॉइटहेड, सुप्रसिध्द शिक्षण तज्ञ.

१९१९: आंद्रिआस पापेन्द्रु, ग्रीसचा पंतप्रधान.

१९३०: वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक.

१९३४: निक्लॉस वर्थ, स्वित्झर्लंडचा संगणकशास्त्रज्ञ.

मृत्यू

११४५: पोप लुशियस दुसरा.

१६३७: फर्डिनांड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.

१८४४: हेन्री ऍडिंग्टन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

१८४७: जर्मिनल पिएर डँडेलिन, बेल्जियन गणितज्ञ.

१८४९: पिएर फ्रांस्वा वेर्हल्स्ट, बेल्जियन गणितज्ञ.

१८६९: मिर्झा गालिब, उर्दू कवी.

१८२८: एच.एच. ऍस्क्विथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

१९५९: ओवेन विल्यम्स रिचर्डसन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.

१९६५: नॅट किंग कोल, अमेरिकन संगीतकार.

१९८०: कुष्ठरोग्यांचे पहिले भारतीय सेवक पद्मश्री मनोहर दिवान यांचे निधन.

१९८८: रिचर्ड फाइनमन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

१९९९: हेन्री वे केन्डॉल, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.