१९४५: व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
१९४९: महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी.
१९७१: इंटेल कंपनी ने जगातील पहिले व्यावसायिक मायक्रोप्रोसेसर चीप ४००४ प्रकाशित केले.
१९८९: सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.
१९९६: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सासाकावा पर्यावरण पुरस्कार जाहीर. पर्यावरणाचे रक्षण आणि नियोजन
या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
१९९९: रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसनर्थ पुरस्कार प्रदान
२०००: देशाचे अठ्ठाविसावे राज्य म्हणून झारखंड हे राज्य अस्तित्त्वात आले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून भाजपचे बाबूलाल मरांडी यांनी शपथ घेतली.

१६३०: जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ योहान केपलर. (जन्म: २७ डिसेंबर १५७१)
१७०६: ६वे दलाई लामा. (जन्म: १ मार्च १६८३)
१९४९: महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील प्रमुख आरोपी नथुराम गोडसे . (जन्म: १९ मे १९१०)
१९४९: महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी नारायण दत्तात्रय आपटे.
१९८२: आचार्य विनोबा भावे –भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, भारतरत्‍न –१९८३ मरणोत्तर, १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या
केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली. (जन्म: ११ सप्टेंबर १८९५)
१९९६: कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माधवराव सूर्याजी पवार .
२०१२: केन्द्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष कृष्ण चंद्र पंत . (जन्म: १० ऑगस्ट १९३१)
२०१५: सईद जाफ़री , भारतीय-ब्रितानी बहुमुखी अभिनेताअभिनेते (जन्म: ८ जानेवारी, १९२९)