८७८: एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनीचे काम सुरू झाले.
१८८८: गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.
१९१७: पहिले महायुद्ध – जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हारी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.
१९३२: टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली.
याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्त्वात आली.
१९३५ : टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली.
याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्त्वात आली.
१९६८: हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक प्रदान.
१९७३: हेन्री किसिंजर आणि ली डक यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.
१९८४: आर्च बिशप डेसमंड टुटू यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.
१९९३: वर्णभेदामुळे निर्माण झालेला अविश्वास दूर करुन, दक्षिण अफ्रिकेत लोकशाही रुजवण्याच्या प्रयत्नांबद्दल अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते
नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर
१९९७: भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा बुकर पुरस्कार मिळाला.
१९९९: जागतिक फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठी यांना प्रदान.
२०१४: हुदहुद वादळाने नेपाळमध्ये प्रकोप, एका भारतीया सहित २१ लोकांचा मृत्यू
२०१४: भारतातील महाराष्ट्र व हरियाणा राज्यात विधानसभा निवडणूका पार पडल्या.
१७८९: रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे –उत्तर पेशवाईतील प्रामाणिक, निष्पक्षपाती, निर्भीड आणि प्रसिद्ध न्यायाधीश, पुणे दरबारात
१५७१ मधे त्यांची शास्त्री म्हणून नेमणूक झाली. थोरले माधवराव जेव्हा पेशवे झाले तेव्हा रामशास्त्री सरन्यायाधीश होते. (जन्म: १७२०)
१९१७: पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर माता हारी. (जन्म: ७ ऑगस्ट १८७६)
१९१८: भारतीय गुरू आणि संत शिर्डीचे साई बाबा .
१९३०: डाऊ केमिकल कंपनी चे संस्थापक हर्बर्ट डाऊ. (जन्म: २६ फेब्रुवारी १८६६)
१९४४: ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक गुरुनाथ प्रभाकर ओगले.
१९४६: जर्मन नाझी हर्मन गोअरिंग. (जन्म: १२ जानेवारी १८९३)
१९६१: सूर्यकांत त्रिपाठी निराला –हिन्दी साहित्यिक. त्यांनी ४४ ग्रंथ लिहिले. कन्येच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या सरोजस्मृती या शोकगीताची
हिन्दीतील सर्वश्रेष्ठ विलापिकांमध्ये गणना होते. (जन्म: २१ फेब्रुवारी १८९६)
१९९७: मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक दत्ता गोर्ले .
२००२: लेखक व पटकथाकार वसंत सबनीस . (जन्म: ६ डिसेंबर १९२३)
२०१२: कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान नॉरदॉम सिहानोक . (जन्म: ३१ ऑक्टोबर १९२२)