१८१२: नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन थडकले.
१८२१: कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडुरास, निकाराग्वा आणि अल सॅल्व्हाडोर या देशांचा स्वातंत्र्यदिन.
१८३५: चार्ल्स डार्विन जहाजातून गॅलापागोस द्वीपात पोहोचले.
१९१६: पहिल्या महायुद्ध – पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर.
१९३५: भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डून स्कूल सुरू झाले.
१९३५: जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.
१९४८: भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले.
१९४८: एफ-८६ सेबरजेट प्रकारच्या विमानाने ताशी १,०८० किमीची गती गाठून उच्चांक नोंदवला.
१९५३: श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.
१९५९: प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.
१९५९: निकिता क्रुस्चेव्ह हे अमेरिकेला भेट देणारे पहिले रशियन नेते.
१९६८: सोव्हिएत संघाच्या झाँड ५ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
१९७८: तीन वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे मुहम्मद अली हे पहिले बॉक्सर बनले.
२०००: ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे २७व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू.
२००८: लेहमन ब्रदर्सया वित्तीय संस्थेची अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी दिवाळखोरी.
२०१३: निना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली.

२०१६: वेगवान उष्णकटीबंधीय चक्रीवादळ मेरान्तीच्या तडाख्याने फिलीपींस, तायवान आणि चीन मधे जवळजवळ 30 लोकांचा मृत्यू

१९९८: गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि अखिल भारतीय स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विश्वनाथ लवंदे यांचे मलेरियाच्या आजाराने निधन झाले.
२००८: गंगाधर गाडगीळ –साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ञ, ५६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म: २५ ऑगस्ट १९२३)
२०१२: के. एस. सुदर्शन –प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक (जन्म: १८ जून १९३१)