घटना

१६८१: छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.

१९०५: लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, तेव्हा वायभंगाच्या चळवळीत देशभक्तानी वंदे मातरम् चा जल्लोष केला.

१९२०: अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.

१९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण.

१९५५: पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन.

१९९५: आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.

१९९६: पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड.

१९९८: ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

२००८: टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण.

2016: साई इंग वेन ताइवानच्या प्रथम महिला राष्ट्रपति म्हणून निवडून आल्या

जन्म

१८५३: मिचेलीन टायर्स कंपनी चे संस्थापक फ्रेन्च उद्योगपती आंद्रे मिचेलिन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९३१)

१९२०: कायदेपंडित आणि अर्थतज्ञ नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००२)

१९२६: संगीतकार ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी २००७)

१९४६: चित्रपट अभिनेते कबीर बेदी यांचा जन्म.

मृत्यू

१९०९: समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८४२)

१९३८: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८७६)

१९५४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे निधन. (जन्म: ३ जून १८९०)

१९६६: आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८७९)

१९६७: अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९०१)

१९८८: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ. लक्ष्मीकांत झा यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १९१३ – भागलपूर, बिहार)

१९९७: कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या.

२०००: मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत त्रिलोकीनाथ कौल यांचे निधन.

२००३: सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक रामविलास जगन्नाथ राठी यांचे निधन.

२००५: संगीतकार, पेटीवाले मेहेंदळे उर्फ श्रीकृष्ण हरी मेहेंदळे यांचे निधन.