१७७५: ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले.
१७९३: फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्नी मेरी अॅंटोनिएत हिचा गिलोटीनवर वध करण्यात आला.
१८४६: डॉ. जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.
१८६८: डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्क ब्रिटिशांना विकले.
१९०५: भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.
१९२३: वॉल्ट डिस्ने आणि त्याचा भाऊ रॉय डिस्ने यांनी द वॉल्ट डिस्ने कंपनी ची स्थापना केली.
१९५१: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.
१९६८: हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान.
१९७३: हेन्री किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१९७५: बांगला देशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली.
१९७८: माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचण्यासाठी वांडा रुटकिविझ पहिल्या युरोपियन महिला आहे.
१९८४: आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१९८६: ८००० मीटर पेक्षा उच्च असणारी १४ शिखरे सर करणारे रिइनॉल्ड मेस्नर हे पहिली व्यक्ती ठरले.
१९९९: जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्स, स्नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्स खेळाडूसाठी दिला जाणारा
फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.
१७९३: फ्रेन्च सम्राज्ञी मेरी आंत्वानेत . (जन्म: २ नोव्हेंबर १७५५)
१७९९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक वीरपदिया कट्टाबोम्मन. (जन्म: ३ जानेवारी १७६०)
१९०५: आध्यात्मिक गुरू पंत महाराज बाळेकुन्द्री. (जन्म: ३ सप्टेंबर १८५५)
१९४४: गुरुनाथ प्रभाकर ओगले –उद्योजक, प्रभाकर कंदिलचे निर्माते, ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक (जन्म: ? ? १८८७)
१९४८: माधव नारायण तथा माधवराव जोशी –नाटककार. जळगाव येथे झालेल्या ३४ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष.
पालिकांच्या कारभारावरील टीकेमुळे गाजलेले म्युनिसिपालिटी हे नाटक त्यांनी लिहिले होते. (जन्म: १८८५)
१९५०: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक वि. गं. तथा दादासाहेब केतकर.
१९५१: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या. (जन्म: १ ऑक्टोबर १८९५)
१९८१: इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख मोशे दायान. (जन्म: २० मे १९१५)
१९९७: मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक दत्ता गोर्ले.
२००२: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार. (जन्म: २३ नोव्हेंबर १९२३)
२०१३: भारतीय नाटककार गोविंद पुरुषोत्तम देशपांडे.