१७१८: ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.
१७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.
१९२७: हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस
आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.
१९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
१९४१: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन.
१९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
२०१६: लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांची लष्करप्रमुखपदी आणि एअर चिफ मार्शल बी. एस. धनाओ यांची वायुदलप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
२०१६: आयपीएस ए. के. धस्माना यांची रॉ च्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांची आयबी च्या प्रमुख पदी निवड करण्यात आली.
२०१६: विजेंदर सिंग यांनी फ्रान्सिस चेका ला हरवून डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद स्वतःकडेच जिकून ठेवले.

१७४०: चिमाजी अप्पा –पेशवाईतील पराक्रमी सेनापती. त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून पश्चिम किनारा मुक्त केला. मोठ्या निकराची झुंज देऊन
पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईचा किल्ला व साष्टी बेट जिंकून घेतले.
१९०७: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ लॉर्ड केल्व्हिन. (जन्म: २६ जून १८२४)
१९२७: क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी . (जन्म: २३ जून १९०१)
१९३३: १३ वे दलाई लामा थुब्तेन ग्यात्सो. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७६)
१९३८: चारुचंद्र बंदोपाध्याय –बंगाली कथालेखक व कादंबरीकार. प्रवासी, मॉडर्न, रिव्ह्यू इ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता.
(जन्म: ११ आक्टोबर १८७६ –चांचल, माल्डा, बांगला देश)
१९५६: पं. शंकरराव व्यास –गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य (जन्म: २३ जानेवारी १८९८)
१९५९: डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या –स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला
हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. (जन्म: २४ डिसेंबर १८८० –गुंडुगोलानू, पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश)
१९६५: भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या. (जन्म: ३० मार्च १९०६)
१९८५: मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार (जन्म: २२ मार्च १९२४)
२०००: अ‍ॅजाल पारडीवाला –अ‍ॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक
२०१०: देवदत्त दाभोळकर –पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी (जन्म: २३ सप्टेंबर १९१९)