१८३१: ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्‍वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.
१८६९: भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्‍या सुएझ कालव्याचे उद्‍घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.
१९३२: तिसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. या परिषदेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व इंग्लंडमधील लेबर पार्टीने बहिष्कार टाकल्यामुळे
या परिषदेला केवळ ४६ प्रतिनिधी उपस्थित होते.
१९३३: अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.
१९५०: ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे १४वे दलाई लामा बनले.
१९९२: देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.
१९९२: महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.
१९९४: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्‍या पूर्ण करून नवा विक्रम केला.
१९९६: पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या
नॅशनल अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस चे फेलो म्हणून निवड.

१८१२: द टाईम्स वृत्तपत्र चे संस्थापक जॉन वॉल्टर.
१९२८: स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय. (जन्म: २८ जानेवारी १८६५)
१९३१: संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री . (जन्म: ६ डिसेंबर १८५३)
१९३५: गोपाळ कृष्ण देवधर –भारत सेवक समाजाचे (Servants of India Society)एक संस्थापक सदस्य, सेवासदन
या संस्थेचे शिल्पकार, सहकारी चळवळीचे आद्य समर्थक (जन्म: २१ ऑगस्ट १८७१)
१९६१: कुसुमावती आत्माराम देशपांडे –साहित्यिक व समीक्षक, ग्वाल्हेर येथील ४३ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा (जन्म: १० नोव्हेंबर १९०४)
२००३: भारतीय गायक सुरजित बिंद्राखिया. (जन्म: १५ एप्रिल १९६२)
२०१२: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. (जन्म: २३ जानेवारी १९२६)
२०१२: भारतीय उद्योगपती पॉंटि चड्डा . (जन्म: २२ ऑक्टोबर १९५७)
२२०१५:अशोक सिंघल, विश्व हिंदू परिषदेचे भूतपूर्व अध्यक्ष.(जन्म: १५ सप्टेंबर, १९२६).
२०१५: लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक,जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हाजी नाका
परिसरातील दाट जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण
२०१८:एलेक पद्मसी ,भारतीय अभिनेता (गाँधी),भारतीय रंगमंच व्यक्तिमत्व ,जाहिरात फिल्म निर्माते (जन्म: ५ मार्च, १९२८)