१८३१: मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction)गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.
१८८८: थॉमस एडिसन यांनी ऑप्टिकल फोनोग्राफ (प्रथम चित्रपट) साठी पेटंट दाखल केले.
१९१७: पहिले महायुद्ध – इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्बहल्ला केला.
१९३१: माफिया डॉन अल कपोन यांना आयकर बुडवल्याबद्दल शिक्षा झाली.
१९३३: अल्बर्ट आइनस्टाइ हे नाझी जर्मनीतुन पळून अमेरिकेत आले.
१९३४: प्रभातचा अमृतमंथन हा चित्रपट पुण्याच्या प्रभात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्याच दिवशी या चित्रपटाची हिन्दी आवृत्ती मुंबईच्या
कृष्णा चित्रपटगृहात प्रदर्शित झाली. हिन्दीत हा चित्रपट २९ आठवडे चालला. हिन्दी चित्रपटाचा रौप्यमहोत्सव होण्याची ही पहिलीच वेळ होती.
१९४३: बर्मा रेल्वे – रंगून ते बँकॉक हा रेल्वेमार्ग पूर्ण झाला.
१९५६: पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र अधिकृतपणे ईंग्लंडमध्ये सुरु झाले.
१९६६: बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९७९: मदर तेरेसा यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला.
१९९४: पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV)विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ. टी. जेकब जॉन यांना
डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक जाहीर
डॉ. टी. जेकब जॉन यांना डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक जाहीर.
१९९६: अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.
१९९८: आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्‍या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान.

१७७२: अअफगणिस्तानचा राज्यकर्ता अहमदशाह दुर्रानी (दुराणी) याचे निधन. अहमदशाहने दुर्र-इ-ईरान असा आपला किताब जाहीर
केल्यापासून अब्दाली टोळ्या दुर्रानी नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.
१८८२:दादोबा पांडुरंग तर्खडकर –इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक, संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करुन व मराठी
भाषेच्या रुपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून त्यांनी व्याकरण सिद्ध केले. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही त्यांनी लिहिले. (जन्म: ९ मे १८१४)
१८८७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव्ह किरचॉफ . (जन्म: १२ मार्च १८२४)
१९०६: जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली. (जन्म: २२ ऑक्टोबर १८७३)
१९८१: भारतीय लेखक, कवी आणि गीतकार कन्नादासन . (जन्म: २४ जून १९२७)
१९९३: विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट –चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक, त्यांचे रामराज्य (१९४३), बैजू बावरा (१९५२), गूंज उठी शहनाई (१९५९),
हिमालय की गोद में (१९६५) हे चित्रपट खूप गाजले. फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. (जन्म: १२ मे १९०७ –पालिताणा, गुजराथ)
२००८: ललित लेखक रविन्द्र पिंगे . (जन्म: १३ मार्च १९२६)
२००८: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस चे सहसंस्थापक बेन व्हिडर. (जन्म: १ फेब्रुवारी १९२३)