१८६७: सोविएत रशियाला ७२ लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला.
१८७९: थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना.
१९०६: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन ची स्थापना केली.
१९१९: राम गणेश गडकरी लिखित संगीत भावबंधन या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या बळवंत संगीत नाटक मंडळी ने केला.
१९२२: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना.
१९५४: टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची घोषणा केली.
१९६७: सोविएत रशियाचे व्हेनेरा-४ हे अंतराळयान शुक्रावर उतरले.
१९७७: २०६०-चिरॉन हा अंतरिक्षातील सर्वात दूरवरील लघुग्रह शोधण्यात आला.
२००२: कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.
१८७१: चार्ल्स बॅबेज –इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ, पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक (जन्म: २६ डिसेंबर १७९१)
१९०९: लालमोहन घोष –देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष, भारताच्या विविध राजकीय हक्कांकरिता त्यांनी इंग्लंडमधील
ब्रिटिश जनतेत प्रचार केला. (जन्म: १७ डिसेंबर १८४९ –कोलकता )
१९३१: अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थॉमस अल्वा एडिसन . (जन्म: ११ फेब्रुवारी १८४७)
१९५१: पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर. (जन्म: २२ नोव्हेंबर १८८५)
१९७६: भारतीय कवी आणि लेखक विश्वनाथ सत्यनारायण . (जन्म: १० सप्टेंबर १८९५)
१९८३: क्रिकेटपटू विजय मांजरेकर . (जन्म: २६ सप्टेंबर १९३१)
१९८७: वसंतराव तुळपुळे –कम्युनिस्ट कार्यकर्ते. कार्ल मार्क्सच्या दास कापिटाल या ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता.
१९९३: मंदाकिनी विश्वनाथ आठवले –भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री. दादासाहेब फाळके यांच्या त्या कन्या होत.
त्यांनी फाळके यांच्या कालियामर्दन या मूकपटात काम केले होते.
१९९५: छायालेखक ई. महमद .
२००४: चंदन तस्कर वीरप्पन . (जन्म: १८ जानेवारी १९५२)
२०१८: नारायण दत्त तिवारी, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेश राज्याचे इ.स. २००७ पासून राज्यपाल होते.( जन्म.: १८ ऑक्टोबर, १९२५)