घटना

१८३९: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.

१९०३: अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.

१९४९: पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली.

१९४९: क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली.

१९५४: कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन.

१९५६: देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम जाहीर.

१९६६: भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी यांनी पदभार स्वीकारला.

१९६८: पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.

१९८६: (c)brain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.

१९९६: ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांना मध्य प्रदेशाचा कालिदास सन्मान जाहीर.

१९९६: प्रसिध्द मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड.

२००६: नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.

२००७: सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.

जन्म

१७३६: वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश शास्रज्ञ आणि संशोधक जेम्स वॅट यांचा जन्म.

१८०९: अमेरिकन गूढ व भयकथांचे लेखक व कवी एडगर अ‍ॅलन पो यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १८४९)

१८८६: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९५२)

१८९२: विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचा जन्म.

१९०६: चित्रपट दिगदर्शक, अभिनेते आणि निर्माते विनायक दामोदर कर्नाटकी उर्फ मास्टर विनायक यांचा जन्म.

१९२०: संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरचिटणीस झेवियर पेरेझ द कुइयार यांचा जन्म.

१९३६: बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९८१)

मृत्यू

१९०५: भारतीय तत्त्वज्ञानी देबेन्द्रनाथ टागोर यांचे निधन.

१९६०: मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १८९०)

१९९०: भारतीय तत्त्वज्ञानी आचार्य रजनीश यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९३१)

२०००: उद्योगपती व क्रिकेट प्रशासक मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९१८)