१९४६: अफगणिस्तान, आइसलँड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९६०: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना.
१९६९: फूटबॉलपटू पेले यांनी १,००० वा गोल केला.
१९६९: अपोलो-१२ या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड आणि अ‍ॅलन बिल हे चंद्रावर उतरले.
१९९८: व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे द पोर्ट्रेट ऑफ अ‍ॅन आर्टिस्ट विदाऊट अ बेअर्ड हे चित्र ७.१५ कोटी डॉलर्सना विकले गेले.
१९९८: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू.
१९९९: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते ढाक्क्याचे
डॉ. मोहम्मद युनूस यांना देण्यात आला.
२०००: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ
डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान..

१८८३: सर कार्ल विल्हेम सिमेन्स –जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता, अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारी सिमेन्स ही
बलाढ्य कंपनी त्याच्याच भावाने स्थापन केली आहे. (जन्म: ४ एप्रिल १८२३)
१९७१: कॅप्टन गो. गं. लिमये –मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक, मुंबईत आरोग्याधिकारी असताना हिवतापाला कारणीभूत होणार्‍या
डासांवर अभ्यास करुन त्यांनी डास तो काय? अशा पुस्तकांची मालिका लिहिली होती.
१९७६: कोव्हेन्ट्री कॅथेड्रल चे रचनाकार बॅसिल स्पेन्स . (जन्म: १३ ऑगस्ट १९०७)
१९९९: कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रामदास कृष्ण धोंगडे .