महाराष्ट्र दिन / गुजरात दिन
जागतिक कामगार दिन
कामगार दिन : अमेरिका व अमेरिकाप्रभावित देश वगळता जगभर.
लेइ दिन : हवाई.
बेल्टेन : आयर्लंड.
राष्ट्रीय प्रेम दिन : चेक प्रजासत्ताक.
कायदा दिन : अमेरिकेची संयुक्त संस्थाने.महत्त्वाच्या घटना
१७०७: किंगडम ऑफ इंग्लंड व किंगडम ऑफ स्कॉटलंड मिळून किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन बनवण्यात आले.
१७३९: चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर निकराचा हल्ला केला. तीन महिन्याच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात आली.
१८४०: द पेनी ब्लॅक हे पहीले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प युनायटेड किंगडममध्ये जारी केले गेले.
१८४४: हाँगकाँग पोलिस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलिस दल स्थापन झाले.
१८६२ : मुंबई विद्यापिठाचा पहिला पदवीदान समारंभ.
१८८२: आर्य महिला समाजा ची पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे स्थापना झाली.
१८८६ : या दिवशी अमेरिकेत आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी संप सुरू झाला. हा दिवस जगभर (अमेरिका सोडून) कामगार दिन म्हणून पाळला जातो.
१८८६: आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसर्या बैठकीत पहिल्यांदा साजरा केला.
१८९०: जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.
१८९७: रामकृष्ण मिशन ची सुरूवात स्वामी विवेकानंद यांनी केली.
१९२७: जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
१९३०: सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
१९४०: युद्ध सुरू असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या.
१९५६: पोलियोची लस जनतेस उपलब्ध.
१९६० : द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.
१९६०: गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१९६१: क्युबाचे पंतप्रधान फिदेल कॅस्ट्रो यांनी क्यूबा देश समाजवादी राष्ट्र घोषित करून निवडणुका रद्द केल्या.
१९६२: महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.
१९७२ : कोळसा खाणीचे राष्ट्रीतीकरण करण्यात आले.
१९७८: जपान चे नामी उमुरा हे एकटे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत.
१९८१ : सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती
१९८३: अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.
१९९८: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.
१९९९: नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.
२००९: स्वीडन मध्ये समलिंगी विवाह अधिकृत करण्यात आला.
2014: नायजेरियाच्या राजधानी अबुजाच्या न्यान्या बस अड्ड्यावर बॉम्बस्फोट २० लोक मृत्यूमुखी ,६० हून अधीक जखमी
2014: भारतात चेन्नई सेंट्रल रेलवे स्टेशन वर बैंगलोर-गुवाहाटी एक्सप्रेसमध्ये दोन बॉम्बस्फोट,अनेक मृत्यूमुखी
जन्मदिवस / जयंती
१२१८: जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १२९१)
१९१३: अभिनेता बलराज साहनी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९७३)
१९१५: हिन्दी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल उर्फ अंचल ,रामेश्वर शुक्ल, आधुनिक हिंदी कवी. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९९५)
१९१९: भारतीय भाषेतील प्रतिभासंपन्न पार्श्वगायक मन्ना डे यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर २०१३)
पार्श्वगायक व संगीतकार ,हिंदी व वंग चित्रपटसृष्टीतील गायक,पद्मश्री, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार(सन-२००७ चा)
१९२२: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते मधु लिमये यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९९५)
१९३२: कर्नाटकचे १६ वे मुख्यमंत्री आणि केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचा जन्म.
१९४३: नृत्यांगना सोनल मानसिंह यांचा जन्म.
१९४४: केंद्रीय मंत्री आणि आमदार सुरेश कलमाडी यांचा जन्म.
१९७१: भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर अजित कुमार यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी
१९४५: जर्मनीचा चॅन्सेलर नाझी नेता जोसेफ गोबेल्स यांचे निधन. (जन्म: २९ ऑक्टोबर १८९७)
१९५८: नाटककार गणेश शिवराम उर्फ नाना जोग यांचे नागपुर येथे निधन.
१९७२: उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज. (जन्म: २३ जानेवारी १९१५)
१९९३: स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते ना. ग. गोरे. (जन्म: १५ जून १९०७)
१९९८ : गंगुताई पटवर्धन, शिक्षणतज्ञ.
२००२ : पंडित आवळीकर, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक.
२०१३: निखील एकनाथ खडसे यांचे निधन.