१७८९: न्यूजर्सी अमेरिकेचे पहिले राज्य बनले.
१८७७: थाॅमस अल्वा एडिसन यांनो ग्रामोफोन चा शोध लावला.
१९१७: युक्रेन प्रजासत्ताक बनले.
१९४५: न्युरेम्बर्ग ट्रायल्स – दुसर्‍या महायुद्धातील गुन्ह्यांसाठी २४ जणांवर खटला सुरू झाला.
१९५९: युनायटेड नेशन्सने बालहक्कांच्या घोषणापत्राची दखल घेतली.
१९८५: मायक्रोसॉफ्ट विंडोज १.० प्रकाशीत झाले.
१९९४: भारताची ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी बनली.
१९९७: अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री
आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.
१९९८: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.
१९९९: अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा हॅरी होल्ट पुरस्कार लता जोशी यांना जाहीर.
१९९९: आर. जी. जोशी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत पिंगळे यांना जाहीर.
२००८: अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे डाऊ जोन्स निर्देशांक १९९७ पासुनच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
२०१६: उत्तर प्रदेशमधील पुखरायण गावाजवळ इंदूर-राजेन्द्रनगर एक्सप्रेस रुळांवरुन घसरल्याने १५० ठार.अनेक जखमी