१८७७: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.
१९११: संसदेच्या निवडणुकीत उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल
येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला.
१९४२: राजा नेने दिग्दर्शित दहा वाजता हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
१९५५: संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.
१९५६: संयुक्त महाराष्ट्र लढ्याला सुरुवात होऊन १ मे, इ.स. १९६० ला संयुक्त महाराष्ट्र चळवळ लढा यशस्वी झाला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र एक झाला.
१९६२: भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.
१९६२: भारत चीन युद्ध –भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्‍या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.
१९७१: भारीतय वायुदलाची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धातील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. बांगलादेश मुक्ती संग्राम –
भारतीय सैन्य व बांगलादेश मुक्ती वाहिनी यांनी गरीबपूरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याचा दारुण पराभव केला.
१९७२: दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.