१८५४: फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.
१८७९: थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.
१८८८: स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली.
१९३४: जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली.
१९४३: सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना.
१९४३: सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.
१९४५: फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१९५१: डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.
१९८३: प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.
१९८७: भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले.
१९८९: जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
१९९२: अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना महापृथ्वी या बंगाली चित्रपटातील
भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
१९९९: चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
२००२: मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.

४२२: फ्रान्सचा राजा चार्ल्स (सहावा) . (जन्म: १६ सप्टेंबर १३८०)
१८३५: तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार. (जन्म: २४ मार्च १७७५)
१९८१: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे . (जन्म: ३१ जानेवारी १८९६ –धारवाड, कर्नाटक)
१९९०: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक प्रभात रंजन सरकार . (जन्म: २१ मे १९२१)
१९९५: अमेरिकन ज्योतिषी व लेखिका लिंडा गुडमन. (जन्म: ९ एप्रिल १९२५)
२०१०: भारतीय कवी आणि अनुवादक अ. अय्यप्पन . (जन्म: २७ ऑक्टोबर १९४९)
२०१२: चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते यश चोप्रा. (जन्म: २७ सप्टेंबर १९३२)