१८०३: दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई.
१८४६: अअर्बेन ली व्हेरिअर व त्याच्या २ सहकार्‍यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करुन शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.
१८७३ : महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
१८८४: महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली.
१९०५: आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी कार्लस्टॅड कराराद्वारे वेगेळे होण्याचा निर्णय घेतला.
१९०८: कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा ची स्थापना झाली.
१९३२: हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव देण्यात आले.
१९८३: सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
२००२: मोझिला फायरफॉक्स ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.

१८५८: मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ. (जन्म: ८ जुलै १७८९)
१८७०: फ्रेंच लेखक, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ प्रॉस्पर मेरिमी. (जन्म: २८ सप्टेंबर १८०३)
१८८२: जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर. (जन्म: ३१ जुलै १८००)
१९३९: आधुनिक मानसशास्त्राचा जनक सिग्मंड फ्रॉईड . (जन्म: ६ मे १८५६)
१९६४: नाटककार भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर . (जन्म: २७ एप्रिल १८८३)
१९९९: मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते गिरीश घाणेकर.
२००४: शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा . (जन्म: २८ जानेवारी १९२५)
२०१२: जादूगार कांतिलाल गिरीधारीलाल ऊर्फ के. लाल .

२०१४: शंकर वैद्य ,मराठी साहित्यकार होते. तसच समीक्षक, शिक्षक, ललित लेखक, उत्तम वक्ते व सूत्रसंचालक (जन्मतारीख: १५ जून, १९२८)
२०१५: भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ दयानंद सरस्वती. (जन्म: १५ ऑगस्ट १९३०)
२०१८ : कल्पना लाज़मी भारतीय फ़िल्म निर्माता,भारतीय फिल्म निर्देशिका, निर्माता आणि लेखिका (जन्म-३१ मे, १९५४ )