१६६४: नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम इंग्लंडच्या हवाली केले.
१८७३: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
१९३२: पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या.
१९४६: हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेज ची स्थापना झाली.
१९४८: होंडा मोटार कंपनीची स्थापना.
१९६०: अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
१९७३: गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
१९९४: सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीचे वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्युदंडाचा फतवा मागे.
१९९५: मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला.
हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.
१९९९: कैगा अणूशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.
२००७: कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली भारताने टी-२० विश्वकप जिंकला.
२०१४: मार्स ऑर्बिटरी मिशन (एमओएम) –भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इसरो) प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटर ने मार्स ची कक्षा ओलांडली.
२०१३: पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.७ तीव्रतेचा धरणीकंप. ३७०पेक्षा जास्त ठार.
२०१५: सौदी अरेबियाच्या मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरी होउन ७१७ ठार तर ८००पेक्षा अधिक व्यक्ती जखमी झाल्या.

१८९६: स्वीडन देशाचे पहिले पंतप्रधान लुईस गेरहार्ड डी गेर. (जन्म: १८ जुलै १८१८)
१९३९: युनिव्हर्सल स्टुडियो चे संस्थापक कार्ल लामेल्स्. (जन्म: १७ जानेवारी १८६७)
१९९२: सर्वमित्र सिकरी –भारताचे १३ वे सरन्यायाधीश (जन्म: २६ एप्रिल १९०८)
१९९८: वासूदेव पाळंदे –बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक व कुशल संघटक. पुण्यातील प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन,
महाराष्ट्रीय कलोपासक, जागर इ. नाट्यसंस्थांच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
२००२: श्रीपाद रघुनाथ जोशी –लेखक, शब्दकोशकार व अनुवादक