१६०९: गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
१८२५: उरुग्वे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला.
१९१९: जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली.
१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले.
१९६०: इटलीतील रोम येथे १७व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९८०: झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९९१: बेलारुसने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
१९९१: लिनस ट्रोव्हाल्डस याने लिनक्स (Linux) या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित केली.
१९९१: एअरबस ए-३२० ने पहिले उड्डाण केले.
१९९७: दक्षिण कन्नडा (South Canara) जिल्ह्याचे विभाजन करुन उडुपी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला.
१९९८: एनसायकक्लोपिडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या संपादकीय आवृत्तीच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.
या आवृत्तीतील भारताच्या सीमा चुकीच्या दाखवल्यामुळे तसेच जम्मू काश्मीर राज्याविषयी चुकीची माहिती दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
२००१: सरोद वादक अमजद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.
१२७०: फ्रान्सचा राजा लुई (नववा) . (जन्म: २५ एप्रिल १२१४)
१८१९: स्कॉटिश संशोधक जेम्स वॅट . (जन्म: १९ जानेवारी १७३६)
१८२२: विल्यम हर्षेल –जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार. १७३८ मधे त्याने युरेनस ग्रहाचा शोध लावला. (जन्म: १५ नोव्हेंबर १७३८)
१८६७: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे. (जन्म: २२ सप्टेंबर १७९१)
१९०८: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थवैज्ञानिक हेन्री बेक्वेरेल . (जन्म: १५ डिसेंबर १८५२)
२०००: डोनाल्ड डकचा जन्मदाता हास्यचित्रकार कार्ल बार्क्स . (जन्म: २७ मार्च १९०१)
२००१: डॉ. वसंत दिगंबर तथा व. दि. कुलकर्णी –संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व समीक्षक. त्यांचे ’धुळाक्षरातून मुळाक्षराकडे’ हे आत्मचरित्र एका वेगळ्या स्वरुपामुळे गाजले.
२००१: टायरेल रेसिंग चे संस्थापक केन टाइरेल. (जन्म: ३ मे १९२४)
२००८: उर्दू शायर सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज . (जन्म: १२ जानेवारी १९३१)
२०१२: नील आर्मस्ट्राँग –चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव (जन्म: ५ ऑगस्ट १९३०)
२०१३: भारतीय गायक-गीतकार रघुनाथ पनिग्राही . (जन्म: १० ऑगस्ट १९३२)
२०१८: जॉन मैककेन, जॉन सिडनी मॅककेन तिसरा हा एक अमेरिकन राजकारणी व ॲरिझोना राज्यातून वरिष्ठ सेनेटर.(जन्मतारीख: २९ ऑगस्ट, १९३६)