घटना

१७५५: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.

१८८१: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.

१९४१: प्रभातचा शेजारी हा चित्रपट रिलीज झाला.

१९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.

१९८२: आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्‍न प्रदान.

१९९१: मोरारजी देसाई यांना भारतरत्‍न प्रदान.

१९९५: अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले.

२००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्‍न प्रदान.

जन्म

१६२७: आयरिश रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर १६९१)

१७३६: इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १८१३)

१८६३: सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे यांचा जन्म.

१८७४: इंग्लिश लेखक आणि नाटकाकर डब्ल्यू. सॉमरसेट मॉम यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९६५)

१८८२: ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४१)

१९३८: नाटककार व समीक्षक सुरेश खरे यांचा जन्म.

१९५८: पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म.

मृत्यू

१६६५: सोनोपंत डबीर यांचे निधन.

१९८०: सोलापूरचे दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचे निधन.

१९९६: रंगभूमी व चित्रपट अभिनेते प्रशांत सुभेदार यांचे निधन.

२००१: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे यांचे निधन.

२०१५: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२७ – हातकणंगले)