महत्त्वाच्या घटना

१९११: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात जन गण मन हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत
प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.
१९१८: बृहद पोलंडमध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड पुकारले गेले.
१९४५: २८ देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank)आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(International Monetary Fund)स्थापन केले.
१९४५: कोरिया देशाची फाळणी झाली.
१९४९: इंडोनेशिया देशाला नेदरलँड्स पासून स्वातंत्र्य मिळाले.
१९७५: बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार ठार झाले.
१९७८: ४० वर्षाच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक बनले.
२००४: मॅग्नेटर एसजीआर १८०६-२० ला स्फोट झाल्यामुळे उत्सर्जित किरण पृथ्वीला पोहोचते.
२००७: पाकिस्तानातील माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची गोळी मारून हत्या करण्यात आली.