महत्त्वाच्या घटना

१६१२: गॅलिलियो यांनी नेपच्यून ग्रहाची नोंदी केली, परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले.
१८३६: स्पेनने मेक्सिको देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
१८४६: आयोवा हे अमेरिकेचे २९ वे राज्य बनले.
१८८५: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय पक्ष स्थापन झाला.
१८९५ : ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक.
पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त ३५ फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला २० खेळ होऊन
दिवसाला २००० फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले.
१९०८: मेसिना, सिसिली येथे भूकंप. ७५००० लोकांचे निधन.
१९४८: मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.
१९९५: कझाकस्तान मधील बैकानूर अंतराळ तळावरून भारताच्या आयआरएस १-सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण केले.

२०१५: इराकी सेनेने रामादी शहराला इस्लामिक स्टेटच्या ताब्यातून मुक्त केलं.