१९२४: पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली.
१९२८: सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ होताना आढळली. यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला.
१९३९: दुसरे महायुद्ध – वॉर्साने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९५०: इंडोनेशिया देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
१९५८: फ्रान्स देशाने नवीन संविधान स्वीकारले.
१९६०: माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
१९९९: महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर
२०००: विख्यात नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना विष्णूदास भावे गौरव पुरस्कार जाहीर
२००२: सलमान खान यांच्या पांढऱ्या टोयोटा लँडक्रुझर गाडीचा वांद्रे येथे अपघात, अपघातात १ मृत्यू तर ४ गंभीर जखमी.
२००८: स्पेसएक्स कंपनी ने फाल्कन १ हे पहिले खाजगी अंतराळयान प्रक्षेपित केले.
२०१५: भारताची पहिली वेधशाळा अॅस्ट्रोसॅटचे इसरोने आंध्र प्रदेश मधील श्रीहरिकोटावरून पीएसएलवी द्वारा सफल प्रक्षेपण केले
२०१५ : मंगळ ग्रहावर तरल अवस्थेत पाणी दिसल्याची नासा ने पुष्टी केली.

१८९५: रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर. (जन्म: २७ डिसेंबर १८२२)
१९३५: कायनेटोस्कोप चे संशोधक विल्यम केनेडी डिक्सन . (जन्म: ३ ऑगस्ट १८६०)
१९५३: अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल. (जन्म: २० नोव्हेंबर १८८९)
१९५६: बोइंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोइंग . (जन्म: १ ऑक्टोबर १८८१)
१९६७: सुविख्यात क्रांतिकारक व थोर तपस्वी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट.
१९७०: इजिप्तचे दुसरे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दल नासर.
१९८१: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष रोम्लो बेटानको यु र्ट .
१९८९: फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस. (जन्म: ११ सप्टेंबर १९१७)
१९९१: अमेरिकन जॅझ संगीतकार माइल्स डेव्हिस.
१९९२: पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे मेजर ग. स. ठोसर.
१९९४: भारतीय चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन के. ए. थांगवेलू . (जन्म: १५ जानेवारी १९१७)
२०००: सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते श्रीधरपंत दाते.
२००४: इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे लेखक डॉ. मुल्कराज आनंद. (जन्म: १२ डिसेंबर १९०५)
२०१२: चित्रपट संकलनासाठी शोले या चित्रपटाचे सर्वोत्तम पारितोषिक विजेते प्रसिद्ध संकलक एम. एस. शिंदे.
२०१२: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा . (जन्म: २९ सप्टेंबर १९२८)