महत्त्वाच्या घटना
१९३०: सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला.
१९५९: नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECHयेथे There is plenty of room at the bottomहे प्रसिद्ध भाषण दिले.
ही nanotechnologyची सुरुवात मानली जाते.
१९५९: पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
जन्मदिवस / वाढदिवस
१८००: रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर . (मृत्यू: १ जुलै १८६०)
१८०८: अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन. (मृत्यू: ३१ जुलै १८७५)
१८०९: ब्रिटीश पंतप्रधान विल्यम ग्लँडस्टोन.
१८४४: कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेशचंद्र बनर्जी .
१९००: मास्टर दीनानाथ मंगेशकर –शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (मृत्यू: २४ एप्रिल १९४२)
१९०४:कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू –ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी (मृत्यू: ११ नोव्हेंबर १९९४)
१९१७: निर्माते-दिगदर्शक रामानंद सागर . (मृत्यू: १२ डिसेंबर २००५)
१९२१: फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष डोब्रिका कोसिक. (मृत्यू: १८ मे २०१४)
१९४२: राजेश खन्ना – चित्रपट अभिनेते, निर्माते आणि राज्यसभेचे सदस्य. (मृत्यू: १८ जुलै २०१२)
१९६०: ओस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड बून .
१९७४: अभिनेत्री ट्विंकल खन्ना.
मृत्यू / पुण्यतिथी
१९६७: पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ प्रणव रंग –गायक व संगीत अभ्यासक, १९५५ मधे
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: २४ जून १८९७)
१९८६: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड मॅकमिलन. (जन्म: १० फेब्रुवारी १८९४)
१९७१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड.
२०१२: इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक टोनी ग्रेग. (जन्म: ६ ऑक्टोबर १९४६)
२०१३: भारतीय लेखक आणि अनुवादक जगदीश मोहंती . (जन्म: १७ फेब्रुवारी १९५१)
२०१४: भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी हरी हरिलेला . (जन्म: १० ऑगस्ट १९२२)
२०१५: पंजाबचे २५ वे राज्यपाल ओमप्रकाश मल्होत्रा. (जन्म: ६ ऑगस्ट १९२२)