ठळक घटना

१९९६: क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.
२०००: शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला.
२०१२: ६३४ मीटर उंचीच्या टोकियो स्काय ट्री या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले.

जन्म/वाढदिवस

१८९६: भारताचे ४ थे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९९५)
१९०४: भरतनाट्यम नर्तिका रुक्मिणीदेवी अरुंडेल यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९८६)
१९४०: उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा जन्म.
१९८४: भारतीय हॉकी खेळाडू अॅडम सिंक्लेअर यांचा जन्म.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

१५९२: इटालियन संगीतकार अलेस्सांद्रो स्ट्रिजियो यांचे निधन.
१९४०: इंग्लिश लेखक एडवर्ड फ्रेडरिक बेन्सन यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९४७)
१९४४: फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष पेह्र एविंड स्विन्हुफ्वुड यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८६७)
१९५६: फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष एल्पिडियो क्विरिनो यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १८९०)