घटना

१७८०: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले.

१८६१: कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.

१८८६: कार्ल बेंझ यांना जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्‍या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.

१९७५: इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.

जन्म

१२७४: संत निवृत्तीनाथ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १२९७)

१७३७: अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक थॉमस पेन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून १८०९)

१८४३: अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅक किनले यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर १९०१)

१८५३: ओडिया साहित्यिक मधुसूदन राव यांचा जन्म.

१८६०: रशियन कथाकार व नाटककार अंतॉन चेकॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९०४)

१८६६: साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक रोमेन रोलँड यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर १९४४)

१९२२: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००३)

१९२६: भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते एकमेव मुस्लिम डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम यांचा जन्म. (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९९६ – ऑक्सफर्ड, इंग्लंड)

१९३६: भारतीय कवी आणि गीतकार वसुरी सुंदरमूर्ति यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे २०१०)

१९५१: वेस्ट इंडिजचे जलदगती गोलंदाज अँडी रॉबर्टस यांचा जन्म.

१९७०: ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज राज्यवर्धनसिंग राठोड यांचा जन्म.

१९८१: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आणि गायक रचना खाताऊ यांचा जन्म.

मृत्यू

१५९७: मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचे निधन. (जन्म: ९ मे १५४०)

१८२०: इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचे निधन. (जन्म: ४ जून १७३८)

१९३४: नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिटझ हेबर यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १८६८ – वॉर्क्लॉ, पोलंड)

१९६३: लेखक व संपादक सदाशिव आत्माराम जोगळेकर यांचे निधन.

१९६३: अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १८७४)

१९९३: गणितज्ञ रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय यांचे निधन.

१९९५: रुपेरी पडद्यावरील खलनायक, निर्माते व दिग्दर्शक रुपेश कुमार यांचे निधन.

२०००: बासरीवादक देवेन्द्र मुर्डेश्वर यांचे निधन.

२०००: शिवसेना नेते पांडुरंग सावळाराम तथा काका वडके यांचे निधन.

२००१: महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राम मेघे यांचे निधन.