१८७७: थॉमस एडिसन यांनी पहिल्यांदा फोनोग्राफचे प्रात्यक्षिक केले.
१९४५: युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.
१९६३: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी वॉरन समिती नेमली.
१९७२: अटारी यांनी पोंग हा गेम प्रकाशित केला.
१९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर.
२०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्‍कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर.
२०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

१९२६: कृष्णाजी नारायण आठल्ये –ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, केरळ कोकिळ या मासिकाचे संस्थापक व संपादक (जन्म: १८५२ –टेंभू, सातारा, महाराष्ट्र)
१९३९: माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन – कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते (जन्म: २१ जानेवारी १८९४)
१९५०: महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी बाया कर्वे .
१९५९: रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई –मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार (जन्म: १७ मे १८६५)
१९९३: जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. (जन्म: २९ जुलै १९०४)
२००१: बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरिसन . (जन्म: २५ फेब्रुवारी १९४३)
२०११: आसामी साहित्यिक व कवियत्री इंदिरा गोस्वामी .