जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरुकता दिन

१८७०: गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.

१९८२: फॉकलंडचे युद्ध – अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.

१८९४: छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.

१९८४: सोयुझ टी-११ या अंतराळयानातून राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. ते ७ दिवस २१ तास ४० मिनिटे अवकाशात होते.

१९८९: ताणलेले संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे क्यूबातील हॅवाना येथे आगमन.

१९९०: स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.

१९९८: कोकण रेल्वेवरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस या गाडीचा प्रारंभ झाला.

२०११: क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताने २८ वर्षांनंतर विजय मिळवला.

जन्म/वाढदिवस

१६१८: इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ फ्रॅन्सिस्को मारिया ग्रिमाल्डी .

१८०५: डॅनिश परिकथालेखक हान्स अँडरसन.

१८७५: ख्राइसलर कंपनीचे संस्थापक वॉल्टर ख्राइसलर. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४०)

१८९८: हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते व सरोजिनी नायडू यांचे बंधू हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय. (मृत्यू: २३ जून १९९० – मुंबई, महाराष्ट्र)

१९०२: पतियाळा घराण्याचे गायक बडे गुलाम अली खाँ. (मृत्यू: २५ एप्रिल १९६८ – हैदराबाद, तेलंगण)

१९२६: कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर. (मृत्यू: १५ जून १९७९)

१९४२: भारतीय इंग्रजी-अभिनेते रोशन सेठ .

१९६९: हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण .

१९७२: भारतीय नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा .

१९८१: भारतीय स्टँड-अप कॉमेडीयन कपिल शर्मा .

मृत्यू/पुण्यतिथी

१८७२: मोर्स कोड तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स . (जन्म: २७ एप्रिल १७९१)

१९३३: क्रिकेट खेळाडू महाराजा के. एस. रणजितसिंह. (जन्म: २७ एप्रिल १७९१)

१९९२: हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते आगाजान बेग ऊर्फ आगा .

२००५: पोप जॉन पॉल (दुसरा) . (जन्म: १८ मे १९२०)

२००९: गायक आणि संगीतकार गजाननराव वाटवे. (जन्म: ८ जून १९१७)