१५७४: गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू बनले.
१८३५: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.
१८३५: अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना झाली.
१९४५: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली.
१९७९ : सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटांएवढी ऊर्जा निर्माण करुन हॉवर्ड-कुमेन-मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या
पृष्ठभागावर आदळला. सूर्याच्या पृष्ठभागावर धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.

१७७३: सुमेर गार्दी याने नारायणराव पेशवे यांची शनिवारवाड्यात हत्या केली. (जन्म: १० ऑगस्ट १७५५)
१९४०: सर जे. जे. थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १८ डिसेंबर १८५६)
१९४७: नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी– त्यांची चाफा बोलेना, चाफा चालेना … ही कविता खूप प्रसिद्ध आहे. (जन्म: १ जून १८७२)
१९८१:जयंत पांडुरंग तथा जे. पी. नाईक–शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल
रिसर्च अँड ट्रेनिंगचे संस्थापक, भारतामध्ये प्रथमच स्थापन केल्या गेलेल्या शैक्षणिक आयोगाचे सभासद सचिव (जन्म: ५ सप्टेंबर १९०७)
१९९४: शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे –प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्‌मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४)
१९९८: नरहर वामन तथा नरुभाऊ लिमये –स्वातंत्र्यसैनिक, निर्भिड पत्रकार व काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते (जन्म: ८ नोव्हेंबर १९०९)
२००३: अमेरिकन अभिनेता चार्ल्स ब्रॉन्सन . (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१)
२०१४: बिपिन चन्द्र ,आधुनीक भारताचे इतिहासकार, स्वतंत्रता संघर्ष आणि आधुनिक इतिहास लेखन परंपरेत मार्क्सवादी विचारांचे इतिहासकार(जन्मतारीख: २४ मे, १९२८)
२०१५: भारतीय विद्वान लेखक एम. एम. कळबुर्गी . (जन्म: २८ नोव्हेंबर १९३८)