घटना

१६६५: पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले.

१७२९: थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.

१८४२: अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.

१८५६: पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.

१९२९: भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.

१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.

२०१५: पंडित मदनमोहन मालवीय यांना भारत रत्न तसच इतर काही लोकांना पद्म पुरस्कार प्रदान

जन्म

१८५३: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग . (मृत्यू: २९ जुलै १८९०)

१८९४: इल्युशीन विमान कंपनी चे निर्माते सर्जी इल्युशीन . (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७७)

१८९५: सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन . (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९७५)

१८९९: बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय . (मृत्यू: २२ सप्टेंबर १९७०)

१९०६: भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या . (मृत्यू: १७ डिसेंबर १९६५)

१९०८: अभिनेत्री देविका राणी . (मृत्यू: ९ मार्च १९९४)

१९३८: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे स्थापक क्लाउस स्च्वाब .

१९४२: भाषातज्‍ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके .

१९७७: भारतीय संचालक आणि पटकथालेखक अभिषेक चोब्बे .

मृत्यू

१९५२: भूतानचे २ रे राजे जिग्मे वांगचुक .

१९६९: कवी व समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)

१९७६: चित्रकार रघुवीर मूळगावकर

१९८१: रीडर्स डॅाजेस्ट चे निर्माते डेविट वलास . (जन्म: १२ नोव्हेंबर १८८९)

१९८९: सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे . (जन्म: २४ सप्टेंबर १९२२)

२००२: गीतकार आनंद बक्षी(जन्म: २१ जुलै १९२०)

२००५: भारतीय लेखक आणि चित्रकार ओ. व्ही. विजयन. (जन्म: २ जुलै १९३०)

२०१२: कॅनेडियन-भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अक्विला बेर्लास किंनी .

२०१६: AOL चे सहसंस्थापक जिम किमसे यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९३९)