महत्त्वाच्या घटना
१६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना.
१८०२: इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.
१८७९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.
१९४४: दुसरे महायुद्ध –हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९५५: जनरल मोटर्स वर्षातून 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली.
१९८५: युनायटेड किंग्डम ने युनेस्कोचे सदस्य बनले.
१९९९: बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
१९९९: पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.
२००४: त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ – १०१ या इमारतीचे उद्घाटन झाले.
जन्मदिवस / वाढदिवस
१८७१: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव. (मृत्यू: २५ मे १९५४)
१९१०: पं. मल्लिकार्जुन मन्सूर –हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, (ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य) नीलकंठबुवा अलुरमठ
आणि (जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र) मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले, पद्मविभूषण व कालिदास सन्मान
आदी मानसन्मान त्यांना मिळाले. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९२)
१८७१ : गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव –आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, कन्या आरोग्य मंदिराचे संस्थापक, बडोद्याचे मल्लविद्या विशारद (मृत्यू: २५ मे १९५४)
१९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला. (मृत्यू: २८ ऑक्टोबर २०११)
१९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान.
१९३७: वेल्श अभिनेता अँथनी हॉपकिन्स.
१९४८: अमेरिकन गायिका डोना समर . (मृत्यू: १७ मे २०१२)
१९६५: भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन.
मृत्यू / पुण्यतिथी
१९२६: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे. (जन्म: १२ जुलै १८६३)
१९५३: के.एल.एम. चे संस्थापक अल्बर्ट पेलेस्मान. (जन्म: ७ सप्टेंबर १८८९)
१९८६: केंद्रीय आरोग्य मंत्री राजनारायण .
१९९३: जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष झवेद गमझखुर्डिया . (जन्म: ३१ मार्च १९३९)
१९९७: स्वरराज छोटा गंधर्व . (जन्म: १० मार्च १९१८)