१७५०: पोर्तुगालचा राजा जॉन (पाचवा) . (जन्म: २२ ऑक्टोबर १६८९)
१८०५: भारतीय सैनिक धीरान चिन्नमलाई . (जन्म: १७ एप्रिल १७६५)
१८६५: आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे . (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)
१८७५: अमेरिकेचे १७वे राष्ट्राध्यक्ष अँड्रयू जॉन्सन . (जन्म: २९ डिसेंबर १८०८)
१९४०: भारतीय कार्यकर्ते उधम सिंग . (जन्म: २८ डिसेंबर १८९९)
१९६८: शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर –चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक.
चारही वेदांच्या शुद्ध संहिता, समग्र सार्थ महाभारत, सार्थ अथर्ववेद इ. ग्रंथ त्यांनी लिहिले. ते हिन्दी, मराठी, गुजराती भाषांत प्रसिद्ध झाले.
यांपैकी काही ग्रंथांचे अनुवाद ऊर्दू, कानडी, सिंधी, तेलगू व इंग्रजीमध्येही झाले. (जन्म: १९ सप्टेंबर १८६७)
१९८०: पार्श्वगायक पद्मश्री मोहंमद रफी यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १९२४ – कोटला सुलतान सिंग, पंजाब)
२०१४: भारतीय पत्रकार आणि लेखक नबरुण भट्टाचार्य. (जन्म: २३ जून १९४८)