१७९६: दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.
१८१८: इलिनॉय अमेरिकेचे २१ वे रान्य बनले.
१८२९: लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.
१८७०: बॉम्बे म्युच्युअल लाईफ अॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.
१९२७: लॉरेल आणि हार्डी यांचा पहिला चित्रपट पुटिंग पॅट ऑन फिलिप्स प्रकाशित झाला.
१९६७: डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.
१९७१: पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
१९७९: आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.
१९८४: भोपाळ वायू दुर्घटना –भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे
चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.
१९९४: जपानमध्ये प्लेस्टेशन रिलीझ करण्यात आले.
१५५२: सेंट फ्रान्सिस झेविअर –ख्रिस्ती धर्मप्रसारक. यांनी भारत व जपानमधे हजारो लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली.
गोव्यातील ओल्ड चर्चमधे यांचेच शव अजून जपून ठेवण्यात आले आहे. (जन्म: ७ एप्रिल १५०६ – झेविअर, स्पेन)
१८८८: ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट चे निर्माते कार्ल झैस . (जन्म: ११ सप्टेंबर १८१६)
१८९४: इंग्लिश लेखक व कवी आर. एल. स्टीव्हनसन . (जन्म: १३ नोव्हेंबर १८५०)
१९५१ : बहिणाबाई चौधरी –कवयित्री. त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम
करता करता त्या उत्स्फुर्तपणे ओव्या रचून गात असत. (जन्म: २४ ऑगस्ट १८८०)
१९५६: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय . (जन्म: १९ मे १९०८)
१९७९: भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद . (जन्म: २९ ऑगस्ट १९०५)
२०११: हिंदी चित्रपट अभिनेते देव आनंद यांचे लंडन. (जन्म: २६ सप्टेंबर १९२३)
१८९४ : आर. एल. स्टीव्हनसन –इंग्लिश लेखक व कवी (जन्म: १३ नोव्हेंबर १८५०)