महत्त्वाच्या घटना
१६०८: सॅम्यूअल बी. चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्युबेक शहराची स्थापना केली.
१८५०: ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.
१८५२: महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.
१८५५: भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.
१८८४: डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.
१८८६: जर्मनीच्या कार्ल बेन्झ यांनी जगातील पहिली मोटारगाडी बनवली.
१८९०: ओहायो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.
१९२८: लंडनमध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण झाले.
१९३८: मॅलार्ड हे वाफेचे इंजिन ताशी १२६ मैल (२०२ कि. मी.) वेगाने न्यू कॅसलहून लंडनला पोहोचले. वाफेच्या इंजिनाचा हा वेगाचा विक्रम अजूनही अबाधित आहे.
१९९८: ए मेरे वतन के लोगो या प्रसिद्ध गाण्याचे कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
२०००: विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात रुपांतर करण्यास
नौदल, राज्यसरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छिमार प्रतिनिधींनी मान्यता दिली.
महात्मा फुले
२००१: सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
२००६: एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून (साधारण चंद्राइतक्या अंतरावरुन) गेला.
२०१७: अचल कुमार ज्योति भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त
जन्मदिवस / वाढदिवस
१६८३: इंग्लिश कवी एडवर्ड यंग.
१८३८: संस्थापकपत्रकार, विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद . (मृत्यू: १३ सप्टेंबर १८९३)
१८८६: धुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक
आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ रामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९५७)
१९०९: स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ
स्वातंत्र्यसैनिक बॅरिस्टर व्ही. एम. तथा भाऊसाहेब तारकुंडे . (मृत्यू: २२ मार्च २००४)
१९१२: मराठी गायक व नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९७७)
१९१४: इतिहासकार,नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे . (मृत्यू: ५ जानेवारी १९९२)
१९१८: भारतीय अभिनेते, निर्माते व्ही. रंगारा राव . (मृत्यू: १८ जुलै १९७४)
१९२४: सिंगापूरचे ६वे राष्ट्राध्यक्ष सेल्लप्पन रामनाथन .
१९२४: भारतीय क्रिकेटपटू अर्जुन नायडू.
१९२६: लेखिका व स्वातंत्र्यसैनिक सुनीता देशपांडे . (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००९)
१९५१: न्यूझीलंडचे क्रिकेट खेळाडू सर रिचर्ड हॅडली .
१९५२: भारतीय गायक अमित कुमार .
१९५२: भारतीय कॅनेडियन लेखक रोहिनटन मिस्त्री .
१९७१: विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज .
१९७६: झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू हेन्री ओलोंगा .
१९८०: भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग .
१९८७: सामाजिक कार्यकर्ते, युवानेते प्रितेश ठाकूर.
मृत्यू / पुण्यतिथी
१३५०: संत नामदेव यांनी समाधी घेतली. (जन्म: २९ ऑक्टोबर १२७०)
१९३३: अर्जेंटिनाचे १९वे राष्ट्राध्यक्ष हिपोलितो य्रिगोयेन . (जम: १२ जुलै १८५२)
१९३५: सिट्रोएन कंपनीचे संस्थापक आंद्रे सीट्रोएन . (जन्म: ५ फेब्रुवारी १८७८)
१९६९: ब्रायन जोन्स ,द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४२)
१९९६: कुलभूषण पंडित तथा राजकुमार ऊर्फ जानी ,जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२६)