पनामा, डॉमिनिका व मायक्रोनेशियाचा स्वातंत्र्यदिन
संस्कृती दिन – जपान
महत्त्वाच्या घटना
१८१७: कॅनडातील सर्वात जुनी चार्टर्ड बँक बँक ऑफ मॉन्ट्रियल सुरु झाली.
१८३८: द टाइम्स ऑफ इंडिया हे जगातील सर्वाधिक खपाचे इंग्लिश दैनिक द बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने मुंबईत सुरू झाले.
१९०३: पनामा देश कोलंबियापासुन स्वतंत्र झाला.
१९११: शेवरोलेट ऑटोमोबाइल कंपनी सुरु झाली.
१९१३: अमेरिकेत आय कर सुरू झाला.
१९१८: पोलंड देश रशियापासुन स्वतंत्र झाला.
१९४४: भारतीय संगीत प्रचारक मंडळातर्फे पुण्यात अखिल भारतीय संगीत परिषदेस सुरुवात.
१९४९: वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.
१९५७: रशियाच्या स्पुटनिक-२ या अंतराळयानातून गेलेली लायका नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली.
मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.
१९८८: श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने
तो मोडून काढला व सरकार वाचवले.
२०१४: वन वर्ल्ड ट्रेड सेंटर अधिकृतपणे सुरु झाले.
२०१४: पाकिस्तानात वाघा बॉर्डरवर फ्लॅग लोअरिंग सेरिमनी दरम्यान आत्मघाती हल्ला ,कमीतकमी ५५ लोकांचा मृत्यू तर २०० हून अधिक जखमी .
जन्मदिवस / वाढदिवस
१६८८: अम्बर संस्थानचे राजा सवाई जयसिंग (दुसरे) . (मृत्यू: २१ सप्टेंबर १७४३)
१९००: अॅडिडास चे संस्थापक एडॉल्फ डॅस्लर . (मृत्यू: ६ सप्टेंबर १९७८)
१९०१: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, रंगमंच आणि सिनेकलावंत व राज्यसभा सदस्य पृथ्वीराज कपूर . (मृत्यू: २९ मे १९७२)
१९१७: भारतीय स्वतंत्रसैनिक अन्नपूर्णा महाराणा. (मृत्यू: ३१ डिसेंबर २०१२)
१९२१: अमेरिकन अभिनेते चार्ल्स ब्रॉन्सन . (मृत्यू: ३० ऑगस्ट २००३)
१९२५: प्रबंधलेखक, संपादक डॉ. हे. वि. इनामदार .
१९३३:अमर्त्य सेन –कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते (१९९८) अर्थशास्त्रज्ञ
१९३७: लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर –चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल
या जोडीतील संगीतकार (मृत्यू: २५ मे १९९८)
१८१९: शाहीर,” फटका” कार, गोंधळी अनंत फंदी .
१८९०: स्विस नॅशनल कौन्सिलचे पहिले अध्यक्ष ओरिचिक ओशेनेबेविन . (जन्म: २४ नोव्हेंबर १८११)
१९७५: बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद. (जन्म: २३ जुलै १९२५)
१९९०: लोकप्रिय चरित्र अभिनेते मामोहन कृष्ण. (जन्म: २६ फेब्रुवारी १९२२)
१९९२: प्रेम नाथ –हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते (जन्म: २१ नोव्हेंबर १९२६)
१९९८: कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. सी. हिरेमठ. (जन्म: १५ जानेवारी १९२०)
१९९८: बॅटमॅन पत्राचे निर्माते बॉब केन यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९१५)
२०००: प्रा. गिरी देशिंगकर –चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक
२०१२: गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा . (जन्म: ५ ऑक्टोबर १९२३)
२०१४: गणेशकुमार नरवाडे उर्फ सदाशिव अमरापूरकर , मराठी नाट्यअभिनेते तसेच हिंदी-मराठी-ओरिया-हरियाणी-भोजपुरी-बंगाली-गुजराती
भाषांतील चित्रपटांत काम करणारे अभिनेते (जन्म.: ११ मे, १९५०)