१८१७: कॅनडातील सर्वात जुनी चार्टर्ड बँक बँक ऑफ मॉन्ट्रियल सुरु झाली.
१८३८: द टाइम्स ऑफ इंडिया हे जगातील सर्वाधिक खपाचे इंग्लिश दैनिक द बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने मुंबईत सुरू झाले.
१९०३: पनामा देश कोलंबियापासुन स्वतंत्र झाला.
१९११: शेवरोलेट ऑटोमोबाइल कंपनी सुरु झाली.
१९१३: अमेरिकेत आय कर सुरू झाला.
१९१८: पोलंड देश रशियापासुन स्वतंत्र झाला.
१९४४: भारतीय संगीत प्रचारक मंडळातर्फे पुण्यात अखिल भारतीय संगीत परिषदेस सुरुवात.
१९४९: वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.
१९५७: रशियाच्या स्पुटनिक-२ या अंतराळयानातून गेलेली लायका नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली.
मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.
१९८८: श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने
तो मोडून काढला व सरकार वाचवले.
२०१४: वन वर्ल्ड ट्रेड सेंटर अधिकृतपणे सुरु झाले.

२०१४: पाकिस्तानात वाघा बॉर्डरवर फ्लॅग लोअरिंग सेरिमनी दरम्यान आत्मघाती हल्ला ,कमीतकमी ५५ लोकांचा मृत्यू तर २०० हून अधिक जखमी .