१८९६: पुण्यात डेक्कन सभेची स्थापना.
१९१८: पहिले महायुद्ध –ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली.
१९२१: जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या.
१९२२: तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश.
१९४८: डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असणाऱ्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.
१९९६: कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा नाट्यगौरव पुरस्कार डॉ. श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर
२०००: हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना आदित्य विक्रम बिर्ला
कलाशिखर पुरस्कार जाहीर.
२००१: हॅरी पॉटर अण्ड फिलॉसॉफर्स स्टोन या चित्रपटाचा लंडन येथे प्रिमियर.
२००८: बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.
२०१५: जस्टिन ट्रूडो कॅनडाचे सत्तावीसावे प्रधानमंत्री बनले.